सुनसगाव प्रकाश हायस्कूल १९८७/८८च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात !

0
42

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले. इयत्ता 10 वी 1987/88 या शैक्षणिक बॅच चे व प्रकाश हायस्कूल सुनसगांव या पूर्वीच्या व सध्याचे दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव ता. भुसावळ जि. जळगांव या शाळेत शिक्षण घेतलेले सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले.

जवळपास 36 वर्षा नंतर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या वेळी हजर होते, त्यात मुंबई , पुणे , औरंगाबाद, नाशिक , जळगाव इ.जिल्ह्यात नोकरी व्यावसाय निमित्ताने गेलेले सर्व जण एकत्र जमले होते . या प्रसंगी माजी शिक्षक भोळे सर, भोळे मॅडम,महाजन सर व शाळेचे चेअरमन श्री. दादासाहेब हरी पांडू पाटील. व कमेटीचे सदस्य आणि विद्यमान मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे सर यांनी सरस्वती पूजन, व दीप प्रज्वलन केले व प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषण जे. पी. सपकाळे सर यांनी केले व माजी गुरुजन भोळे सर, भोळे मॅडम, महाजन सर, यांनी माजी विद्द्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्रसंगीं माजी विद्यार्थी श्री रविंद्र पाटील यांनी भक्ती गीता द्वारे स्वागत केले शाळेचे चेअरमन हरी पांडू पाटील साहेब व संचालक दिलीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी महेश कावळे यांनी परिचय देत प्रकाश हायस्कूल सुनसगाव शाळे बद्दल गौरवोद्गार काढले .

आमची ही शाळा हे असे विद्येचे माहेरघर आहे की ज्यामध्ये उच-नीच, जात-पात, गरीब-श्रीमंत हा भेदभाव होत नाही. तसेच शिक्षक ही असा कुठला भेदभाव करत नाही. म्हणून शाळा आणि शिक्षक श्रेष्ठ आहे. कारण शाळेत फक्त न फक्त ज्ञान दानाचे कार्य होते. आणि आपण सर्व त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या बळावर सुखी समाधानी व समृद्ध आहोत असे गौरवोद्गार शाळे बाबत माजी विद्यार्थ्यांनी काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेन सुरवाडे यांनी केले, सर्व प्रथम दिवंगत शिक्षक व विद्यार्थी विद्यार्धिनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रास्ताविक व आभार वंदना पाटील यांनी केले. या कार्यक्रमात स्नेहभोजन, संगीत खुर्ची,अंताक्षरी, गीत गायन, माजी विद्यार्थ्यांची हजेरी इ समावेश होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खालील प्रमाणे माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. गुड्डू (नारायण) चौधरी , विलास पाटील, एम एम चौधरी ,प्रवीण पाटील, कल्पना पाटील ,सुनीता पाटील वंदना आनंदा पाटील  उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चारूलता चिनावले, गोदावरी पाटील ज्योती चौधरी, ज्योती भास्कर ,संजय सुरवाडे, अरुण सुरवाडे प्रल्हाद ढाके, साहेबराव सपकाळे, तुकाराम पाटील ,विमल फिरके, प्रल्हाद पाचपांडे, सुलोचना धनायते, वंदना कोल्हे सुनीता चौधरी, सरला पाटील मुकुंदा पाटील विलास महाजन, पुष्पा खैरनार,ललिता भोळे, नंदिनी धांडे युवराज नारखेडे गोविंदा झटके, कुमुदिनी वारके सुधाकर पाटील. इ.  महेश कावळे यांनी सदर कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

Spread the love