सुनसगाव – आज दिनांक :- 21/06/2023 रोजी दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय , सुनसगाव येथे आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला .
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापक श्री . जे .पी . सपकाळे सर व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री .के .डी .तायडे सर यांनी योगासनां बद्दल मार्गदर्शन करून शाळेतील कलाशिक्षक श्री . एस . एन . महाजन सर यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली त्यांच्या पाठोपाठ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायाम केले त्यात सुरुवातीला प्रार्थना त्यानंतर पूरक हालचाली, योगासने यामध्ये सुरुवातीस ताडासन, वृक्षासन , पादस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन अशा उभ्या पद्धतीने योगासने घेतली बैठक स्थितीतील भद्रासन ,वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन,शलभासन व पाठीवर झोपून सेतुबंधासन ,उत्तान पादासन ,अर्धहलासन व शेवटी शवासन ही आसने केलीत .यानंतर प्राणायाम घेण्यात आले त्यात कपालभ्राती , अनुलोम-विलोम ,भ्रामरीप्राणायाम व शेवटी संकल्प करून शांतीपाठ घेण्यात आला अशा पद्धतीने योगदिन साजरा करण्यात आला या योगदिनासाठी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते .