सुनसगाव विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम उत्साहात .

0
4

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सोनाक्षी पाटील व तिची आई सौ.शारदा पाटील, तसेच इयत्ता आठवीची विद्यार्थिनी केनिशा पाटील तिची आई सौ. चंचल पाटील, इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी आरती तायडे तिची आई सौ.पूजा तायडे यांच्या हस्ते एक पेड मा के नाम अभियानाचे औपचारिक वृक्षारोपण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत शालेय परिसर व बाह्य परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच पालकांना त्यांच्या अंगणात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले या योजनेबद्दल व वृक्षारोपणाबद्दल श्री एन बी चौधरी राष्ट्रीय हरित सेना प्रमुख यांनी सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. पी.सपकाळे सर ज्येष्ठ शिक्षक के. डी.तायडे सर व सर्व शिक्षक व पालक संघ सभेस आलेले पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love