प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री विठ्ठल मंदीर ट्रस्ट चे सचिव प्रविण प्रल्हाद पाटील यांनी चेअरमन चंद्रकांत भोळे यांच्याकडे दि.२२ /७/२०२५ रोजी सकाळी १० वा आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला. या आधी सुध्दा दि.१४/९/२०२४ रोजी प्रविण पाटील यांनी राजीनामा दिला होता मात्र त्यावेळी चेअरमन यांनी त्यांची समजूत काढली होती. परंतु अचानक तडका फडकी राजीनामा का दिला ? याचे कारण समजू शकले नसून आता कार्यकारणी मंडळ काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.