प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथील श्री मनुदेवी मंदीर प्रांगणात बीएएसएफ कंपनी मार्फत महाचर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी विवेक पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, मका या पिकांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येण्यासाठी कोणत्या औषधीचा वापर करावा या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव तालुका प्रतिनीधी तुषार पाटील, कल्पेश राणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सुनसगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.