प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे आदिवासी भिल्ल समाजाकडून सालाबादप्रमाणे यंदाही श्री मरी आई मंदीरात जाऊन पूजन करण्यात आले. दरवर्षी आदिवासी भिल्ल समाजा कडून श्रावण महिन्यात मरी मातेची पूजन करुन गावात फुटाणे, गुळ, खोबरे असा प्रसाद वाटण्यात येतो. यावेळी भगत गोपाळ भुरा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन करण्यात आले. यावेळी मालचे, ठाकरे, सोनवणे परिवारातील सर्व नागरीक उपस्थित होते.