सुनसगाव विद्यालयात इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप .

0
37

सुनसगाव ता भुसावळ । वार्ताहर – येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात नुकताच इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी विद्यालयाचे शिक्षक हेमंत साळुंखे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परिक्षेची भिती दूर केली तसेच भिती वाटत असेल तर ध्यानधारना करुन हिंमत वाढवावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन आर डी पाटील तर प्रमुख पाहुणे हरी पांडू पाटील ,दिलीप पाटील, डिगंबर पाटील ,चंद्रकांत पाटील, एल ए पाटील,रविंद्र पाटील तसेच संस्थेचे संचालक उपस्थित होते प्रास्तविक मुख्याध्यापक जे पी सपकाळे यांनी तर बक्षिस वाचन एन बी चौधरी यांनी केले. गुण महत्वाचे नाहीत तर ज्ञान महत्वाचे पुढे स्पर्धा परीक्षा देऊन गावाचे व शाळेचे नावलौकिक वाढवावे असे आवाहन आर डी पाटील यांनी केले तर काँपी करणार नाही असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला सूत्रसंचलन जयश्री पाटील मँडम तर आभार पी एन बागुल यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love