प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामु पांडू पाटील विद्यालयात सुदर्शन पेपर व रोटरी क्लब ई लाईट यांच्या कडून वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सुदर्शन पेपर मील चे संचालक राजीव चौधरी व बिना चौधरी यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले .गेल्या २००२ साला पासून वह्या वाटपाची परंपरा सुरु असून शाळेतील ३४० विद्यार्थ्यांना जवळपास तीन हजार वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी रोटरी क्लब ई लाईट चे अध्यक्ष संदीप झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन आर डी पाटील तर प्रमुख पाहुणे अजित महाजन , नितीन इंगळे ,श्रीराम परदेशी , दर्शन भैय्या ,चारु इंगळे ,संजय लाठी ,मित मेहता ,डिगंबर पाटील होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जे पी सपकाळे यांनी तर सूत्रसंचलन सौ.जे एस पाटील यांनी व आभार एच बी साळुंखे यांनी मानले .यावेळी विद्यार्थ्यांना नविन वह्या मिळाल्याने विद्यार्थी आनंदात होते. सुदर्शन पेपर मील चे राजीव चौधरी यांनी ही परंपरा सुरु ठेवल्याने विद्यालयाच्या संचालक मंडळाने आभार मानले.