सुनसगाव येथे आग , सुदैवाने जिवितहानी टळली !

0
81

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये अचानक दुपारच्या वेळी धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दिसल्याने आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने जिवीतहानी टळली.

या बाबत माहिती अशी की , दि.५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रमेश गुरुजी व विकासोचे सचिव योगेश पाटील यांच्या घराच्या मागच्या बाजूस सहकार नगरात जाणाऱ्या रस्त्याला लागून उकिरडा व त्याच्या बाजूस काड्या पडलेल्या होत्या या ठिकाणी अचानक आग लागली विशेष म्हणजे या ठिकाणी विजतारा सुध्दा नाही त्यामुळे आग लागली कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगीने काही क्षणात ऋद्र रुप धारण केले होते.आगीचे लोट एवढे मोठे होते की जवळचे झाड जळाले आहे आणि वरतून गेलेली केबल वितळली आहे.

या रस्त्यावरुन नेहमी दारूड्यांची ये – जा सुरु असते त्यामुळे एखाद्या दारुड्याने पेटलेली बिडी टाकली असावी असे महिलांनी सांगीतले.

या परिसरात खळवाडी सारखे वाडे आहेत शेतकरी गुरांना लागणारा चारा व शेती अवजारे तसेच शेतीउपयोगी सामान याच परिसरात ठेवतात त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे सुज्ञ शेतकऱ्यांनी सांगीतले. याच ठिकाणी रमेश गुरुजी यांच्या ट्युबवेल वरुन पाणी पुरवठा सुरू करुन आगीवर ग्रामस्थांनी नियंत्रण मिळविले अन्यथा आगीने रुद्ररुप धारण केले असते अशी चर्चा यावेळी सुरु होती.

Spread the love