प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री मनुदेवी मंदीर परीसरात असलेल्या नागदेवता मंदीरात असलेली १३ किलो वजनाची पितळी नागदेवता मुर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना दि.१५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली .या बाबत पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी तालुका पोलीसांना माहिती दिली आहे.
याच ठिकाणी पाच सहा वर्षापुर्वी मंदीराचा मुख्य दरवाजा तोडून दानपेटी चोरुन नेल्याची घटना घडली होती त्या बाबत आज पर्यंत तपास लागला नाही. आता तर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्यामुळे चोरट्यांचा तपास होणे शक्य आहे. मात्र मंदीराच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नसल्याचे समजते कारण मंदीराच्या ट्रस्ट चे भिजत घोंगडे पडलेले असून आता नविन संभाव्य कार्यकारणीचा फलक लावण्यात आला आहे मात्र मंदीराच्या हिताच्या दृष्टीने या कार्यकारणीने लवकरात लवकर सभा बोलवून कार्यकारणीने मंदीर ताब्यात घेऊन सुविधा उपलब्ध कराव्यात जेणे करुन अशा चोरीच्या घटनावर आळा बसेल अशी चर्चा गावात सुरु आहे.घटनास्थळी भुसावळ तालुका कुऱ्हा पानाचे दुरक्षेत्राचे पोऊनि संजय कंखरे व पोकाँ सचिन पारधी यांनी भेट दिली यावेळी दिनकर पाटील ,लिलाधर पाटील , भालचंद्र पाटील ,एस आर पाटील , भोजू कोळी ,रविंद्र पाटील , रविंद्र कोळी ,राहुल नारखेडे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.