सुनसगाव येथील तिघांचे एकाच दिवशी निधन.

0
38

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील मूळ रहिवाशी असलेल्या तिघांचे दि.७ रोजी निधन झाले. यात मधुकर तुकाराम पाटील ( ह.म.जळगाव ) हे आपल्या मुलाकडे ठाणे येथे गेले होते त्या ठिकाणी दि.७ रोजी मध्यरात्री १ वाजता त्यांचे निधन झाले ते सुभाष तुकाराम पाटील यांचे मोठे बंधू होते . तसेच येथील रहिवाशी माजी सैनिक मोतीराम नारखेडे यांच्या पत्नी व ज्ञानज्योती विद्यालय खडके ता.भुसावळ येथील उपशिक्षिका सौ.प्रमिला मोतीराम नारखेडे यांचे सकाळी ६ वाजता दिर्घ आजाराने भुसावळ येथे राहत्या घरी निधन झाले.आणि गावातील सहकार नगरातील रहिवाशी व माजी ग्रामपंचायत कर्मचारी रोहीदास निवृत्ती पाटील यांचे अल्पशा आजाराने सकाळी १०:३० वाजता निधन झाले.

एकाच दिवशी गावातील तिघांचे निधन होण्याची ही पहिली घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love