प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ –तालुक्यातील सुनसगाव येथे शासनाच्या विविध प्रकारच्या घरकूल योजनेच्या माध्यमातून गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी गावोगावी घरकूल योजना राबविण्यात येत आहे त्यात पंतप्रधान आवास योजना ,शबरीमाता घरकूल योजना ,इंदिरा आवास योजना अशा अनेक योजना मधून गरजूंना घरकूल मिळावे हा उद्देश आहे. येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन म्हणजे मागील पंचवार्षीक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या काळात सन २०२२ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे या घरकुलांची कागदपत्रे तयार करण्यासाठी विद्यमान सरपंच सौ.काजल कोळी व ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा तायडे यांनी ताबडतोब कागदपत्रांची पूर्तता करुन १६० घरकुलांचा मार्ग लावला त्या प्रमाणे अनेकांच्या बँक खात्यात पहिला टप्पा रुपये १५ हजार जमा झाले आहेत. (JSNN) मात्र १६० घरकुला पैकी फक्त ७ घरकुलांचे काम सुरू झाली असल्याचे समजते. १५३ घरकुल धारकांना जागेची अडचण आहे त्यामुळे काही ग्रामपंचायत सदस्य चमकोगीरी करुन जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देतांना दिसत आहेत.
वास्तविक पाहता या घरकूल धारकांना जागा उपलब्ध करुन देण्यात येईल असे खोटे आश्वासन देण्या पेक्षा आज रोजी ज्या ९९ वर्ष करार असलेल्या जागेवर हे रहिवाशी म्हणून राहत आहेत तसेच काही लोकांनी ९९ वर्ष कराराची घरे बक्षिसपत्र म्हणून कायमस्वरुपी विकत घेऊन टाकली आहेत त्याच जागेवर गावातील पंचकमेटी मंडळीचे दाखले घेऊन घरकूल बांधण्यास हरकत नसल्याचा ठराव मंजूर करून घेतला तर अनेकांना घरकूल मिळू शकते मात्र , काही पदाधिकारी मंजूर घरकूल धारकांना योग्य मार्गदर्शन करीत नसल्याने १६० पैकी फक्त ७ घरकुलांचे प्रत्यक्षात घरकुल सुरु असल्याची चर्चा गावात सुरु आहे.