प्रतिनिधी – अमीर पटेल
यावल – मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे त्या समर्थनात यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने यावल येथे साखळी उपोषण सुरू आहे आज उपोषण स्थळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल यांनी भेट देऊन मराठा समाजबंधवान सोबत आरक्षण बद्दल माहिती घेऊन चर्चा केली आणि पाठिंबा दर्शविला यावेळी त्यांच्या सोबत कोरपावली गावचे सरपंच विलास अडकमोल, शिवसेना शाखाप्रमुख भरत चौधरी उपस्थित होते सदर उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले सर, काँग्रेसचे युवानेते अमोल भिरुड, ज्येष्ठपत्रकार डी.बी.पाटील सर, पत्रकार सुनील गवांडे, डॉ. हेमंत येवले सर, अमोलदादा दुसाने, अरुण लोखंडे, दिनकर पाटील, बी. डी. पाटील सर, पवन पाटील, किरण पाटील, गोपाळ महाजन, दिनेश पाटील उर्फ आबा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.