सुषमा अंधारेंना बोलायला ठेवले आहे की भुंकायला

0
11

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची विखारी टीका

औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना बोलायला ठेवले आहे की भुंकायला. त्यांच्या मेंदूला नारू झालाय का, अशा विखारी शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली.

या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. त्यांना बोलायला ठेवले आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

सुषमा अंधारेंनी एका सभेत बोलताना मुंबईत शिवसेनेची सत्ता असताना मातोश्रीवर एक मजलाही चढला नाही. मात्र, दुसरीकडे कृष्णकुंजवर अर्पाटमेंट झाले असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले होते. यानंतर आता प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाजन यांनी राज ठाकरेंवर अंधारेंनी केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. आपल्या मालकाला विचारून त्यांनी बोलले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादीने सप्रमाण दाखवून द्यावे, त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते असे म्हणत प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही जातीच्या लोकांनाच पुढे केले जाते, हे उघड आहे, त्यात हातच्या कंकणाला विरोध कशाला, असा सवालच महाजन यांनी केला आहे.

Spread the love