पनवेल : पनवेल मुंबई गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी एमएच.14 जीए.9585 या क्रमांकाच्या गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महामार्गावर केंद्रित मंत्री नारायण राणे यांचा फार्म हाऊस आहे.
या फॉर्महाऊस लगत हा मृतदेह मागील दोन दिवसांपासून गाडीत आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित गाडी पुणे जिल्ह्यातील आहे. गाडी लॉक असल्याने गाडीतील मृयदेह बाहेर काढण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र एस्पर्टच्या मदतीने गाडी खोलण्याचा प्रयत्न करत होते. गाडीतील संशयास्पद मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बघ्यांचीदेखील मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. संबंधित घटना अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई गोवा रोडवर ऑडी कारमध्ये बॉडी सापडली होती त्याचे नाव संजय कारला असे असून त्याच्या छातीतीत चार गोळ्या मारल्याचे समोर येत आहे. तसेच तो पुण्यामधील गुन्हेगार असल्याचेसुद्धा समजले आहे. पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.