जळगाव – राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या आदेशानुसार जळगाव तालुका युवासेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुक्यातील नंदगाव येथील युवा समाजसेवक स्वप्निल शांताराम सोनवणे यांची युवासेना उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोनवणे हे गेल्या काही वर्षापासून सेनेत कार्यरत आहेत. सेनेसह विविध संघटनांमार्फत तरुणाई व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची सदर नियुक्ती केली आहे. जळगाव तालुक्यासह ग्रामीण मतदार संघात युवासेनेची बांधणी तसेच पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोनवणे हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे यांचे चिरंजीव असून या निवडीबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेनेचे आबा माळी, शिवराज पाटील आदींनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.