जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (मुंबई) आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नंदगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सोनवणे हे गेल्या काही वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २० डिसेंबर रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सोहळ्यात होणार आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये आपल्या सामाजिक कार्याने तसेच पत्रकारितेने परिसरातील जनसामान्यांच्या असंख्य समस्या सोडविणारे, तसेच संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी लढा देऊन पाठपुरावा करणारे स्वप्निल सोनवणे यांच्या विविध उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी संस्थेच्या निवड समितीतर्फे करण्यात आली आहे. सोनवणे हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे तथा नंदगावचे माजी ग्रा.पं.सदस्या रजनी सोनवणे यांचे चिरंजीव असून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.












