धरणगाव:- दि. 18 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने तालुक्यातील झुरखेडा येथेही सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी एकता युथ क्लब आणि नेहरू युवा केंद्र, जळगाव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये निमखेडा व झुरखेडा हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. या रन ची सुरूवात निमखेडा व झुरखेडा हायस्कूल पासून ते विहीर फाट्यापर्यंत करण्यात आली होती. त्या ठिकाणी विविध गायनाचे सादरीकरण केल्यानंतर दौड सुरू झाली. या कार्यक्रमाप्रसंगी निमखेडा व झुरखेडा हायस्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल बडगुजर, शिक्षक-कैलास पाटील,चंपालाल चौधरी, धरणगाव तालुका समन्वयक कल्पना पाटील व एकता युथ क्लबचे सदस्य व हायस्कूलचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
दौडची सुरवात करतांना धरणगाव तालुका समन्वयक कल्पना पाटील म्हणाल्या की, युवा पिढीचे तन, मन सदृढ राहण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया उपक्रम हाती घेतला आहे. युवक देशाचा आधारस्तंभ असून उद्याचा सदृढ भारत निर्माण व्हावा, यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थाचे महत्व ओळखावे. देशभरात कोटीच्या संख्येने युवकांनी आज या अभियानात सहभागी होत आहेत. तन, मन सदृढ ठेवण्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निमखेडा व झुरखेडा हायस्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल बडगुजर यांनी, शरीर सदृढ राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीत जर आरोग्य सुदृढतेची जागरूकता झाल्यास देशाची संविधानिक मूल्ये जपण्यास देखील मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निमखेडा व झुरखेडा हायस्कूलचे चंपालाल चौधरी म्हणाले की, भारतीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी. प्रत्येकाने सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वतःसाठी, देशासाठी फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
निमखेडा व झुरखेडा हायस्कूलचे कैलास पाटील म्हणाले की, आजची तरुणपिढी व्याधीमुक्त राहण्यासाठी अशा दौडचे आयोजन महत्वपूर्ण असून प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे गायन गायले. ‘फिट इंडिया’ची शपथ दिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनकडून काटेकोरपणे पालन करण्यात आले
त्याप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल बडगुजर, शिक्षक चंपालाल चौधरी, कैलास पाटील,
धरणगाव तालुका समन्वयक कल्पना पाटील,एकता युथ क्लबचे सदस्य संदीप चौधरी, राकेश पाटील, लक्ष्मण चौधरी,भारती पाटील,विशाल गायकवाड व शाळेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते












