जळगाव – रामलला श्रीराम मंदिर स्थापना निमित्त जन्मभूमी अयोध्येतून पुजन झालेल्या अक्षदा कलशाचे पुजन जळगाव येथील विश्व हिंदू परिषदे तर्फे 11 कुंडी हवन 101 जोडप्यांच्या हातून पुजन करण्यात आले.
हे अक्षदा कलश सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात दि.25 डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ओकार पार्क, गणपती नगर, प्रल्हाद नगर, मयुर कोलनी, हुडको, पिंप्राळा, सोनी नगर, श्रीराम नगर, सांई नगर, पांडुरंगसाई नगर, हरी विठल नगर, खंडेराव नगर, हुडको परीसरातील भाविकांचे श्रीराम जन्मभूमी अयोध्येत हातभार लागणार असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.












