चोपडा – तालुक्यातील लोणी येथे क्रिकेट खेळात बॅट देण्या-घेण्याच्या रागातुन मोठा वाद होऊन संशयित आरोपींनी गावातील तडवी कुटुंबीयांना जबर व जीवघेणी मारहाण केली आहे.सदर घटनेबाबत फिर्यादी असलम तडवी यांच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
अस्लम सुजात तडवी रा.लोणी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, माझी पत्नी आशा अस्लम तडवी व एक मुलगा अली अशा सह राहतो. मजुरी काम करून उदर निर्वाह करतो. माझे वडील नामे सुजात बिजली खाँ तडवी, आई जसुबाई सुजात तडवी हे वेगळे राहतात.दि.१६ जून २०२३ रोजी मी सायंकाळी घरी असतांना ७ वाजेच्या सुमारास माझे वडील सुजात तडवी हे घरी आले व त्यांनी मला सांगीतले की, मी लोणी बस स्टॅण्ड वर बसलो होतो बस स्टॅण्ड जवळील ग्राउंडवर लहाण मुले क्रिकेट खेळत होते. त्यात अली हा देखील क्रिकेट खेळत होता. अली खेळत असतांना आपल्या गावातील आसीस सत्तार तड़वी हा त्याचे कडे गेला. व त्याने अली याचे कडे बॅट मागीतल्याने ती अली याने दिली त्या नंतर थोडया वेळाने अली याने ती परत मागीतली असता आसीस याने बॅट दिली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी समजवयाला गेलो असता आसीस ने मला धक्काबुक्की करु लागला व बॅट देण्यास नकार दिला असे सांगीतले. मी लागलीच त्या ठिकाणी गेला आसीसला बॅट
मागीतली. परंतु त्याने मला बॅट दिली नाही. माझ्याशी हुज्जतबाजी केली.त्यानंतर मी त तेथुन निघुन गेलो. आसीसला
सदर गोष्टीचा राग आल्याने सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास आसीस सत्तार तडवी, सत्तार जादीर तडवी, सिमरण सत्तार तडवी, फरीदा सत्तार तडवी सर्व रा.लोणी हे सर्व जण माझ्या घरी आले तेव्हा आसीस यांचे हातात लाकडाची झिलपी होती.आसीस याने त्याचे हातातील झिलपी माझ्या डोक्यावर मारली. त्यानंतर माझी पत्नी आयशा ही मला वाचविण्यासाठी आली असता, आसीस याने तीला दोन्ही कडुन बाजुला ढकलले व आसीस व सत्तार यांनी तीला देखील लाकडी झिलपीने डोक्यावर, पाठीवर, उजव्या हातावर मारले.
सिनरन व फरीदा यांनी देखील पत्नीची साडी ओढुन आसीसला सांगीतले की, तुला काय करायचे ते कर असे बोलले. सदर भांडण चालु असताना बाजुला राहणारे गफ्फार गुलाब तडवी, कुर्यानगुल शेरतडवी, असराबाई गफुर तडवी,जुबेदाबाई गफ्फार तडवी यांनी सदरची भांडण पाहून सोडवा सोडव केली. त्यानंतर ते संशयित आरोपी आम्हाला शिवीगाळ व दमदाटी करून तेथून निघून गेले. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेलो आम्हाला मार लागल्याने पोलीसांनी आम्हाला मेडीकल मेमो दिला. त्यानंतर आम्ही चोपडा येथे सरकारी दवाखान्यात उपचार केला. मला बरे वाटल्यानंतर मी समक्ष पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. माझी पत्नी हिस चोपडा येथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरता जळगाव सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. चारही लोकाविरुध्द फिर्यादीने पोलीसात तक्रारीवरून संशयित आरोपी विरुद्ध गु.र.न. ३२४,४५२,५०४ व ५०६ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे.