विटनेर येथील तलाठी ५ हजारांची लाच घेतांना ACB च्या जाळ्यात

0
11

जळगाव :- घरकुल बांधण्यासाठी वाळूची मागणी करणाऱ्या चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठ्याला लाच लुचपत विभागाच्या पथकाने आज मंगळवार २८ रोजी रंगेहाथ अटक केली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र काशिनाथ पाटील (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजुर झालेले होते. घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता होती. विटनेर येथील तलाठी आर.के.पाटील यांनी तक्रारदार यांचेकडेस वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दि.२७ मे २०२४ रोजी तक्रार दिली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पंचासमक्ष मंगळवार दि.२८ रोजी पडताळणी केली असता तलाठी आर.के.पाटील यांनी पंचासमक्ष ५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि तक्रारदारकडून ५ हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई

पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,स.फौ. दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

Spread the love