विमलगिरी हॉस्पिटल व सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
तळोदा– तळोदा शहरात विमलगिरी हॉस्पिटल व सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर उत्साही वातावरणात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. निलेशजी माळी यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पोलीस निरीक्षक मा. श्री. आर.बी. लोखंडे साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन मा. निलेशजी माळी, मा. आर.बी. लोखंडे, प्रा. सुधीरकुमार माळी, व सेवाभावे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री विजयराव सोनवणे (संपर्क सहप्रमुख, विश्व हिंदू परिषद – देवगिरी प्रांत) यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले. मान्यवरांच्या परिचय विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सारंग जी माळी यांनी केले.प्रस्तावना श्री विजयराव सोनवणे यांनी सादर केली. त्यांनी विमलगिरी हॉस्पिटल व सेवाभावे प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले.
उद्घाटक मा. निलेश माळी यांनी आपल्या मनोगतातून असे सांगितले की, “रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, प्रत्येकाने नियमितपणे रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी. तळोदा शहर हे रक्तदान क्षेत्रात अग्रस्थानी असून, याचा अभिमान वाटतो.” प्रमुख पाहुणे मा. पोलीस निरीक्षक आर.बी. लोखंडे यांनी सांगितले की, “रक्तदान म्हणजे एक जीवदान. नागरिकांनी या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून समाजात सकारात्मक संदेश द्यावा.”
कार्यक्रमास भाजप शहराध्यक्ष गौरवभाऊ वाणी,शिरीष माळी विश्व हिंदू परिषदचे डॉ. शांतीलाल पिंपरी, प्रा. राजाराम राणे, मुकेश जैन, संजय माळी, निलेश माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सारंग माळी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुद्र मेडिकलचे संचालक सौरभ माळी, संकेत माळी, पंचम माळी, शांतनू माळी, निषाद माळी, तसेच सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव कविता कलाल, कार्याध्यक्ष संतोष चौधरी, सदस्य अतुल पाटील, अनिल नाईक, नकुल ठाकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.