सुनसगाव – येथे भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्र. पोलीस उपअधीक्षक सतिश कुलकर्णी साहेब यांनी भेट दिली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार जितेंद्र काटे, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश सपकाळे, प्रमोद पाटील (गोंभी), हर्षल पाटील, रोहिदास पाटील उपस्थित होते. यावेळी तंटामुक्ती समिती च्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावातील सुरक्षा वाढवावी असे सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी चर्चा केली. पत्रकार जितेंद्र काटे यांनी गावातील माहिती दिली व गावात सदैव शांतता असते व किरकोळ वाद गावातच मिटवीले जातात असे सांगितले तर रोहिदास पाटील व हर्षल पाटील यांनी ग्राम सुरक्षा दल पुन्हा कार्यक्षम करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी मेजर विनोद पाटील यांनी माहिती दिली. गावातील शांततामय वातावरण पाहून पोलीस उपअधीक्षक अधिकारी सतिश कुलकर्णी साहेबांनी समाधान व्यक्त केले.