तालुकास्तरीय स्पर्धेत वराडसिम विद्यालयाच्या मुलींच्या खो-खो टीमचे वर्चस्व कायम !

0
28

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ -: येथील बियाणी पब्लिक स्कूल येथे मुलींच्या १४ वर्षाखालील आणि १७ वर्षाखालील तालुकास्तरीय खोखो स्पर्धा संपन्न झाल्या.

पंडित नेहरू विद्यालय वराडसीम च्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सेमीफायनल पर्यंत मजल मारली. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने आज झालेले सर्वच्या सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकून फायनल मॅच मध्ये सुद्धा एकतर्फी दणदणीत विजय मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. खेडकर सर यांनी सर्व विजयी खेळाडू मुलींचे आणि क्रीडा शिक्षक व संघाचे मार्गदर्शक श्री. एन.डी. राजपूत सर यांचे अभिनंदन केले आहे.  आता वराडसिम विद्यालयाचे शाळेचे तीन संघ जिल्हास्तरावर खेळतील. त्यामध्ये १४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ.

१७वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ व १७ वर्षाखालील मुलींचा खो-खो संघ जिल्हास्तरावर खेळतील.

Spread the love