तळोदा येथे दिनांक 30 जून 2025 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0
8

तळोदा -: विमलगिरी हॉस्पिटल व सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जून २०२५ रोजी, सोमवार सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत विमलगिरी हॉस्पिटल, कै. सुपडू बाबा कॉम्प्लेक्स, हरकलाल नगर, शहादा रोड, तळोदा येथे “भव्य रक्तदान शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. निलेशजी माळी (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, नंदुरबार) उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मा. श्री. निताईपद दास (नितिन जी पाडवी) (प्रमुख, इस्कॉन मंदिर, कुकरमुंडा, गुजरात) हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. आर. बी. लोखंडे (पोलिस निरीक्षक, तळोदा पोलीस स्टेशन) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या शिबिराचे आयोजन डॉ. सारंग सुधीरकुमार माळी (संचालक, विमलगिरी हॉस्पिटल, तळोदा) व चि. उमेशभैय्या विजयसा सोनवणे (अध्यक्ष, सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

“रक्तदान करा, प्राण वाचवा!”, “रक्तदान हेच जीवनदान!” या घोषणेसह हा उपक्रम घेतला जात असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love