महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या ताप्तीगंगा रेल्वेवर जळगावात दगडफेक

0
66

जळगाव – ताप्तीगंगा एक्सप्रेसवर दगडफेक झाली. धार्मिक यात्रांसाठी प्रवास करणार्‍या हिंदूंवर आक्रमणे करणे, हे आपल्या देशात अनेक वर्षांपासून होत आहे. जळगाव येथेही श्री रामनवमी, गणेशमूर्ती विसर्जन अशा अनेक सण-उत्सवांच्या वेळी आपल्याला हा अनुभव आलेला असेल. मागील वर्षी अयोध्या येथे भाविकांना घेऊन जाणार्‍या रेल्वेसाठीही किती बंदोबस्त द्यावा लागला, हे सर्वांना ठाऊक आहे. असे असताना महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या भाविकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न जळगावमध्ये होणे अत्यंत चुकीचे आहे. दगडफेक करणार्‍यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, रेल्वेच्या आवश्यक यंत्रणांना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस पुरवण्याची व्यवस्था करण्यास सुचवावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली. हे निवेदन गृहमंत्री आणि गृह सचिव यांच्या नावेही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जुलै २०२४ मध्ये भुसावळ – सुरत पॅसेंजरवरही अमळनेर येथे काही मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली होती. त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले होते. त्या वेळी २ दिवसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला; पण पुढे काहीही कारवाई झालेली नाही. आता ताप्तीगंगावरील दगडफेकीच्या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेल्याचे समजते.

Spread the love