सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथे व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची धावपळ उडाली. विटभट्टी व्यवसाय करणारे कच्चा माल झाकण्यासाठी तर शेतकरी चारा व कुट्टी झाकण्यासाठी धावपळ करताना दिसले.सुनसगाव येथे श्री हनुमान मंदीरावर सप्ताहाचा कार्यक्रम होता त्यात महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला मात्र वारा वादळ व विज पुरवठा खंडित झाल्याने अवकाळीचा फटका बसला.यावेळी वादळामुळे जगन्नाथ कंखरे यांच्या घरा जवळील निंबाचे झाड कोलमडून पडले. विजांच्या कडकडाटामुळे नागरिक भयभीत झाले होते.








