तरसोद फाटा येथे माँ कालीमाता मूर्ती स्थापना महोत्सव !

0
31

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – राष्ट्रीय मार्गावर असलेल्या तरसोद फाटा येथील पुरातन प्रसिध्द पोहीचा माथा श्री हनुमान मंदीर येथे दि.३० मार्च पासून देवी माँ कालिका माता मूर्ती व श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरवात होणार असून दि.३० रोजी सकाळी ८ वाजेपासून यज्ञ आणि कलशयात्रा निघणार आहे.दि.३१ रोजी नित्य आवाहन स्थापन ( अन्ना दिवस ) , दि.१ एप्रिल फल प्रत्रादी श्रीवास, दि.२ एप्रिल शयन दिवस आणि दि.३ एप्रिल रोजी नित्य आवाहन दिवस अशा पाच दिवस पूजा पाठ होणार आहे. दि.३० मार्च रोजी तरसोद फाटा ते कालंका माता मंदीर , ईच्छादेवी मंदीर , महादेव पंचमुखी गणेश घाट , श्रीराम मंदीर ,विठ्ठल मंदिर जुने जळगाव तरसोद फाटा अशी शोभायात्रा काढण्यात येणार असून मोठ मोठे तपस्वी व आचार्य यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून राजकिय नेते मंडळी तसेच मन्यारखेडा, नशिराबाद ,तरसोद, जळगाव येथील भाविक उपस्थित राहणार आहेत.

Spread the love