प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील झेटीएस भागात एका तरुणाचा दि.१३ जानेवारी रोजी दुपारी खून झाल्याचे समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, फेकरी येथील भगवान साळवे नगरातील रहिवाशी भावेश अनिल भालेराव (वय २५) या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे समजताच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे तसेच भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पो नि बबनराव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, बीट हवालदार मोरे, प्रेमचंद सपकाळे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचा पोलीस पंचनामा करून मृतदेह ट्रामा सेंटर भुसावळ येथे आणण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत असून या खूनाच्या घटनेनंतर संपूर्ण तालुका हादरला आहे.