रावेर – तालुक्यातील महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांवर कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की काल रात्री मोरगाव खिरवड नदीपात्र नाल्यामध्ये अवैद्य गौण खनिज वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती महसूल पथकाने घटनास्थळी जाऊन चार ट्रॅक्टर ट्रॉलीट्रॉली एम एच 19 एन 2447 २) एम एच 19 टी 1630 3) एम एच 19 सी वाय 1641 4 ) स्वराज नवीन ट्रॅक्टर बिना नंबरचे असे एकूणच चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेली आहे ही कारवाई मंडळाधिकारी विठोबा पाटील सुधीर सोनवणे गजेंद्र शेलकर एचडी बंगाळे यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे अवैद्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे











