जळगाव शहर, व चोपड्या मध्ये ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवार जाहीर

0
80

जळगाव -: जळगाव शहर व चोपडा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली आहे. यामध्ये जळगाव शहर माजी महापौर जयश्री महाजन तर चोपडा येथे मुंबईचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना संधी देण्यात आलेली आहे.

https://polls.aloask.com/?id=21322

जळगाव शहर हा शिवसेनेचा राहिलेला बालेकिल्ला आहे. माजी मंत्री व आमदार राहिलेले सुरेश जैन यांनी जळगाव शहरात आपला उमेदवारी व विजयाचा झेंडा रोवलेला होता. त्यांना माध्यमात भाजपने या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केला होता. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी जळगाव शहरासाठी उमेदवारी देऊन भाजपाच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे चोपडा शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेला या ठिकाणी मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मुंबईवरील उमेदवार आयात करावा लागलेला आहे. राजू तडवी हे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. राजू तडवी मूळचे चोपडा तालुक्यातील मोहरण या ठिकाणचे रहिवाशी असल्याने त्यांना चोपड्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे.

Spread the love