ग.स.च्या थकबाकीदार सभासदांनी “सामोपचार सशर्त कर्ज परत फेड योजनेचा” लाभ घ्यावा.. अध्यक्ष श्री.उदय पाटील यांचे आवाहन.

0
14

जिल्हा प्रतिनिधी/जगन्नाथ बाविस्कर 

जळगाव-:जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड जळगाव (ग.स.) संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री.उदयबापु पाटील,व सर्वश्री.संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक यांनी संस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष धेय्य-धोरणे आखलेली आहेत.यामुळे जिल्हाभरातील संस्थेच्या थकबाकीदार सभासदांकडुन मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुल होतांना दिसत आहे. यासाठी सर्व विभागीय अधिकारी, शाखाधिकारी, यांचेही थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

अजुनही ज्यांच्याकडे वर्षानुवर्षांपासूनची थकबाकी आहे अशा सभासदांसाठी “सामोपचार सशर्त कर्ज परत फेड योजना” जाहीर केलेली आहे. यात प्रामुख्याने जे सभासद आपल्याकडील थकबाकीची रक्कम एकरकमी भरणार असतील त्यांना येणे कर्जावरील कोर्ट फी, वसुली खर्च, दंड व्याज पूर्ण माफ करण्यात येणार असुन येणे व्याजात देखील अंशत: सूट देण्यात येणार आहे.

त्यानुसार जिल्ह्याभरातील ग.स.चे थकबाकीदार सभासदांना या योजनेचे पत्र देण्यात आलेले आहे. अशा थकबाकीदार सभासद व त्यांचे जामीनदार यांनी दि.३१/१२/२०२२ पर्यंत शाखा कार्यालयात प्रत्यक्ष येऊन आपल्याकडील थकबाकी एकरकमी भरण्यासाठी प्रयत्न करावा.

तसेच संस्थेच्या “सामोपचार सशर्त कर्ज परत फेड योजनेचा” लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सहा. आयुक्त श्री.उदय पाटील ,म.न.पा.जळगांव) यांनी केलेले आहे.

Spread the love