गोजोरे येथील तरुणाचा खून मात्र कारण गुलदस्त्यात ?

0
44

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथे अज्ञात कारणावरून शेती शिवारात बोलवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून या मारहाणीत तरुणाला गंभीर मार लागल्याने तरुण मयत झाला असल्याचे मयताच्या वडिलांनी सांगितले असल्याचे समजते.

या बाबत माहिती अशी की दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. गोजोरे येथील रहिवाशी विनोद गंभीर कोळी हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. या तरुणाला गावातील दोन तरुणांनी अज्ञात कारणावरून मारहाण केली होती तसेच दि. १६ रोजी दुपारी बोलवून मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सदर मयत जखमी अवस्थेत असताना नागरिकांनी ट्रामा सेंटर भुसावळ व तेथून शासकीय रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता डॉ सचिन पाटील यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे एपीआय अमोल पवार व सहकारी दाखल झाले. शेवटची माहिती हाती येई पर्यंत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गोजोरे येथील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच ऊशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या बाबत कारण मात्र गुलदस्त्यात आहे. पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

Spread the love