शेवटची पाळी एक मनुष्य जन्म – हभप निवृत्ती महाराज शिरसोली.

0
42

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील कै. रामकृष्ण लक्ष्मण पाटील यांच्या उत्तरकार्या निमित्ताने हभप निवृत्ती महाराज शिरसोलीकर यांचे जाहीर किर्तन झाले. यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चार चरणांचा अतिशय सुंदर असा अभंग’ शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चूकलीया वर्मी फेरा पडे’ ! या अभंगावर विवेचन केले . यावेळी श्राध्दाचे एकूण ९६ प्रकार आहेत असे सांगत ज्यावेळी विसावा दिला जातो त्याठिकाणी जो गुळ आणि कनिक ठेवला जातो त्याला अमान्य श्राध्द असे म्हटले जाते.त्यामुळे अभंगावर विवेचन करताना अनेक नवनवीन विषय मांडले तसेच मनुष्य जन्मात आल्यावर मनुष्याने काय करावे व करु नये या बाबत विवेचन केले. तसेच मृत्यू झाल्याच्या दिवसांपासून तर उत्तरकार्याच्या दिवसांपर्यंत ची सर्व इत्यंभूत माहिती दिली. या किर्तनात मृदंगमणी हभप पंकज महाराज शिरसोली हे होते तर विणेकरी हभप रमेश महाराज सुनसगाव, गायक भजनी नंदलाल भोळे, दिलीप पाटील, लिलाधर पाटील , प्रविण पाटील, दिनकर पाटील, हर्षल पाटील, विनायक कंकरे होते यावेळी हेमराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.

Spread the love