जळगाव -: तालुक्यातील कुसुंबा गावातील ४९ वर्षीय व्यक्तीने कर्जबाराला कंटाळून राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपविली. लीलाधर कौतिक पाटील (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लीलाधर पाटील हे मोलमजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे व काही काम मिळत नसल्याने नैराश्यमध्ये होते. रविवारी घरात कोणीही नसताना त्यांनी या नैराश्येतून जीवनयात्रा संपविली. दुपारी साडेचारच्या सुमारास मुलगा चेतन घरी आल्यानंतर त्याच्या निदर्शनास ही बाब आली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












