कुऱ्हाडीने पत्नीसह पोटच्या पोरांना संपवलं, पण…भयानक घटनेने शहर हादरलं

0
31

जळगाव : जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करुन हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. या घटनेने सध्या शहर हादरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. दोघांचे अगदी कमी वयात लग्न झाले होते. संजय याच्या पत्नीला वयाच्या 18 वर्षाआधी दोन चिमुकली मुलं झाली होती.दोघांचाही सुखी संसार सूरू असतानाच अचानक संजयने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घ्यायला सुरूवात केली होती. या संशयातून आता भयानक हत्याकांड घडल्याची घटना घडली आहे.

संजय सतत चारीत्र्यावर संशय घेत असल्याने घटनेच्या दिवशी पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून संजयने संतापाच्या भरात दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जागीच ठार केले.त्यानंतर पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने पाच ते सहा वार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.तसेच आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले. पण पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने तिच्या मेंदुला जबर मार बसला आहे. तिच्यावर सध्या धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.ही घटना मध्य प्रदेशच्या सीमेवरील देवळी गावी घडली.

सदर प्रकरणी आता शेजाऱ्यांनी संजय पावरा यालापोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.

Spread the love