साकेगाव शिवारातील खूनाच्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या !

0
45

(कानून के हाथ लंबे होते है चा अनुभव)

प्रतिनिधी जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भुसावळ – साकेगाव रस्त्यावर नवोदय विद्यालयाच्या मागे यज्ञेश नेमाडे रा. हनुमान नगर भुसावळ यांच्या शेतात एका अल्पवयीन मुलाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता.

या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरनं १५३/२०२४ बी एन एस कलम१०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोणताही ठोस पुरावा नसल्याने मयताची ओळख पटविणे जिकरीचे होते परंतु भुसावळ तालुका पोलीसांनी आपला तपास सुरु ठेवत अखेर तो मृतदेह अनिल कैलास आव्हाड (वय १२) रा. लोखंडी पुला जवळ भुसावळ याचा असल्याचा शोध लावला त्यानंतर कपड्याने गळा आवळून खून झाल्याचे कारण निश्चित झाल्यावर खून करणारा आरोपी शोधणे एक आव्हान होते. परंतु भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील व बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत यावल तालुक्यातील लोसन बर्डी येथील रहिवाशी पोट्या सुरसिंग बारेला नामक आरोपीला दि. १८ आँगस्ट रोजी पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीचे वय १७ वर्षे ७ महिने आहे. पोलीसांनी ‘कानून के हाथ लंबे होते है’ या वाक्याचा अनुभव आणून दिला असल्याचे बोलले जात असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो नि महेश गायकवाड व साकेगाव बीट तसेच बाजारपेठ पोलीस व उपविभागीय पोलीस अधीक्षक पथकातील सर्व पोलीस कर्मचारी यांचे कौतुक केले जात असून माझ्या सोबत असणाऱ्या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने आम्ही आरोपीला पकडू शकलो असे या गुन्ह्याचे तपासाधिकारी पो नि महेश गायकवाड साहेब यांनी सांगितले.

Spread the love