कोरोना लसीच्या धरसोड भूमिकेमुळे राज्याला फटका

0
11

लसीकरणाच्या संदर्भात केंद्रसरकारची मध्ययुगीन भूमिका आहे. केंद्र सरकारने योग्य पध्दतीने लसीकरणासाठी नियोजन केले असते तर, राज्यात दुसर्‍या लाटेत एवढी लोक दगावली नसती. केंद्र सरकारच्या धरसोड भूमिकेमुळे राज्याला फटका बसल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे dr. nilam gorhe यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर टीका केली.डॉ. निलम गोर्‍हे dr. nilam gorhe या जिल्हा दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी त्या शासकीय अजिंठा विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यावर नियंत्रणासाठी जगात सर्व ठिकाणी १५ डिसेंबर २०२० ला लसीकरण सुरु झाले. मात्र, आपल्याकडे १६ जानेवारीला लसीकरण सुरु केले गेले. त्यातही केंद्र सरकारने टप्पे आखुन दिले. विदेशातील कंपन्या केंद्राशी करार करणार की, राज्याशी करार करणार? असा सवाल उपस्थित करत, डॉ. गोर्‍हे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.केंद्र सरकारने जाहीर केले की, राज्याने टेंडर काढावा. राज्यांना प्रतिसाद मिळणार नाही. तरीदेखील प्रयत्न केले गेले. वास्तविक पाहता, व्हॅक्सीन डिप्लोमसी करायला होती की नाही. जगातील अन्य देशाप्रमाणे केंद्र सरकारने नियोजन केले असतेतर वर्षभरात पुर्ण लसीकरण झाले असते. आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एवढी लोक दगावली नसती. असेही त्यांनी यावेळी सांगितले.राजकीयदृृष्टया उत्सुकतेची कहाणी मनसे आणि भाजपच्या युती संदर्भात विचारले असता, डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या की, दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. राजकारणात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ज्या पक्षाबरोबर युती झाली, युती मोडली, परत भेटतात, चर्चा करतात, अशा दोन पक्षांनी बोलणे, भेटणे राजकीय दृष्ट्या ही फार मोठी उत्सुकतेची कहाणी होईल. असेही त्यांनी भाष्य केले. पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने, नितीन सपके उपस्थित होते.विश्‍वासघाताची पटली खात्री आगामी काळात शिवसेना-भाजप युती होईल का? या प्रश्‍नावर बोलतांना डॉ.गोर्‍हे म्हणाल्या की, राजकारणात अशक्य काही नसते, कायम कोणी कोणाचा शत्रू किेंवा मित्र नसतो. मतभेद निश्‍चित आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून लांब आहोत. ज्या मुद्यावरुन मतभेद झालेत, कुठेतरी जेव्हा विश्‍वासघात झाला. ही खात्री पटली. तेव्हाच आम्ही, आमच्या नवीन साथीदारांसोबत गेलो आहे. असेही त्या म्हणाल्या.

Spread the love