जळगाव :- दादासाहेब द. भी. तायडे यांनी गोर गरीब मुलांकरिता शाळा काठून मोठे शैक्षणिक कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यातून अनेक दलीत, आदिवासी, गोर , गरीब मुलं आज शिक्षण घेत आहेत असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले. दलितमित्र द. भी. तायडे यांच्या ८६ व्या जयंती निमित्त मेहरून येथील रमाबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार भोळे बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या हस्त्ये दहावी, बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका , संघटित व्हा , संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन शिक्षणा करिता शाळा महाविद्यालये काढली तोच वारसा जळगावात दादासाहेब द. भी. तायडे यांनी शैक्षणिक संस्था काढून शाळा , महाविद्यालय सुरू करून पुढं चालविला . आज या संस्थेची मोठी प्रगती झाली यातून अनेक गरीब मुलांना शिक्षणाचे दरवाजे उघडे करण्यात आले, त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिली गेली त्यामुळे शेकडो दलीत , आदिवासी मुलं शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले प्रगती करीत आहेत . असे विचार व्यक्त केले संस्थेच्या तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा यशोदाताई तायडे यांनी संस्थेच्या एकूण प्रगतीचा आढावा घेवून लवकरच आय. टी. आय . सुरू करण्या करिता प्रयत्न केले जातील . आज या शाळेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत . आज संगणक , माहिती तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याने आम्ही सुध्दा त्या मार्गाने संस्था विकसित करू असे सांगितले . प्रा. प्रकाश कांबळे यांनी शिक्षणाचा उपयोग सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक बदला करिता व्हावा असे मत व्यक्त केले. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून अधिकाधिक यश संपादन करावे असे विचार व्यक्त केले .
सुरवातीस महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गझलकार ज्योती वाघ , प्रास्ताविक प्रकाश तायडे , स्वागत शाम तायडे , परिचय अशोक पारधे तर आभारप्रदर्शन प्राचार्य श्रीकांत तायडे यांनी केले .
लोकशाहीचे नाव आहे भीमराव ही कविता धुरंधर यांनी सादर करून सर्वांची मने जिंकली . कवी आर. डी. कोळी यांनी द. भी. तायडे यांच्या कार्यावर आधारित कवितेची फोटो फ्रेम यशोदाताई तायडे यांना प्रदान केली . या नंतर ३५ कवींनी विविध विषयांवर कविता सादर केल्या .
कार्यक्रमास सुरेश कोहली , युवराज वाघ , अनिल तायडे , चित्रकार सुनील दाभाडे , कवी संतोष साळवे , प्रा. यशवंत मोरे , अरुण पटेल , वसीम शेख , संगीता महाजन , पूजा सपकाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर ,विद्यार्थी मोठ्यासंख्येने हजर होते . कार्यक्रमाची सांगता दादासाहेब द. भी. तायडे यांचेवरिल गीताने करण्यात आली .