सुनसगाव – बेलव्हाळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – सरपंच

0
2

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बेलव्हाळ सरपंच सौ मनिषा जितेंद्र खाचणे यांनी केली आहे.

सध्या सुनसगाव ते बेलव्हाळ रस्त्याचे काम सुरू आहे.या कामाची तक्रार बेलव्हाळ ग्रामस्थांनी बेलव्हाळ सरपंच व पदाधिकारी यांच्या कडे केली असता सरपंच पती जितेंद्र खाचणे यांनी स्वता कामाची पाहणी केली तसेच गावातील सुज्ञ नागरिकांनी सुध्दा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने वरिष्ठ अधिकारी तसेच ना.संजयभाऊ सावकारे यांच्या कडे तक्रार केली आहे.पुढे रस्ता होतो आहे आणि मागे खड्डे पडले आहेत तसेच फक्त खडी अथरुन वर डांबर टाकले जाते आहे त्यामुळे या कामाची पाहणी करून काम बंद करावे नाही तर चांगले उत्कृष्ट दर्जाचे काम करावे अशी मागणी सरपंच सौ मनिषा जितेंद्र खाचणे व बेलव्हाळ ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the love