कुसुंबा गावातून ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी

0
45

जळगाव –  तालुक्यातील कुसुंबा गावातील रिक्षा स्टॉपजवळून शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.

याप्रकरणी शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांरिवोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सुर्यसिंग प्रताप पाटील (वय-४७) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एपी ७६२७) आणि ट्रॉली क्रमांक (एमएच १९ एएन ७८६४) हे गावातील रिक्षा स्टॉपवर बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरून नेले. हा प्रकार गुरूवारी २३ नोव्हेंबर रेाजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ट्रॅक्टर आणि ट्रॉली कुठेही आढळून आले नाही. अखेर शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Spread the love