भुसावळ येथे युवकाचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची चर्चा ?

0
12

भुसावळ – येथील शहरातील खडकारोड भागात एका युवकाचा खून झाल्याची घटना आज सकाळी समजली आहे.या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. मयत तरुणाचे नाव नाजीर शेख नशिर ( वय ३२ ) असल्याचे समजते. मयत युवकाच्या छातीवर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या जखमा नागरिकांना दिसल्याचे सांगितले जात आहे. नातेवाईकांना खूनाची घटना समजताच आक्रोश केला. नाजिर शेख नशिर यास सामान्य रुग्णालय जळगाव येथे दवाखान्यात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. सदरची घटना बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तपासाच्या मागे लागले आहेत.

Spread the love