ममुराबाद येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थी आणी पालकांनमध्ये संताप

0
41

जळगाव – :तालुक्यातील ममुराबाद येथून दररोज शेकडो विद्यार्थी जळगाव येथे विविध शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात परंतु गेल्या अनेक दिवसांपासून येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थी आणी पालकांनमध्ये संतापाचे वातावरण पहावयास मिळत आहे.या शेकडो विद्यार्थ्यांनी आपली समस्या ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी मांडली परंतु ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

वास्तविक महामंडळाच्या नियमानुसार सर्व विद्यार्थी पासेस काढतात व बसेस थांबत नसल्याने त्यांना महिन्यातून दहा ते बारा दिवस रिक्षा अथवा भेटेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो व शिक्षण पूर्ण करावे लागत आहे व भाड्याचा भुर्दंड होतो तो वेगळाच आहे सदर विद्यार्थी सकाळी दहा वाजेपासून स्टॉपवर आलेले असतात पण बारा वाजून जातात तरी बस भेटत नाही बस येतात पण थांबत नाही त्यामुळे शाळा महाविद्यालयात विद्यार्थी सतत उशिरा पोहचतात त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत दरवर्षी तक्रारी कराव्या लागत आहेत. याबाबत महामंडळाने योग्य ती कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी विद्यार्थी व पालकांनकडुन केली जात आहे.

Spread the love