महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांत होणार गारपिटीचा पाऊस

0
50

24 डिसेंबरला हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, 26 आणि 27 डिसेंबरला उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.

सध्या देशात हवामानाची स्थिती पाहिली, तर उत्तर भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव जाणवतो आहे आणि दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळं किंवा झंझावात होय. हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या वादळांमुळे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव होतो तर उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो.

तर सध्या महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पश्चिमेला अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवा एकमेकांना भिडल्यामुळे पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये अलर्ट

त्यामुळेच हवामान विभागानं 26 डिसेंबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. तर 27 डिसेंबरला अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Spread the love