तिसरे अपत्य असल्याने एक नामनिर्देशनपत्र अवैध.शिवसेनेला राजकीय “होळी”चा कायदेशीर “चटका” पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे विरावली महिला उपसरपंच बेकायदा कार्यरत.

0
13

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल -तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे,निवडणुकीत एकूण 13 जागांसाठी 37 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी शिवसेना कट्टर समर्थक असलेल्या एका व्यक्तीस 3 अपत्य असल्याच्या कारणाने त्या विरुद्ध 8 जणांनी लेखी पुरावे सादर करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी हरकत घेतली होती त्यानुसार तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून विश्वनाथ धोंडू पाटील या व्यक्तीचे नामनिर्देशनपत्र सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी डी.जे.तडवी यांनी अवैध ठरविले.तिसरे अपत्य असल्याने नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्याचा निर्णय आज दि.17 मार्च 2022 होळीच्या दिवशी सहकार कायद्यानुसार देण्यात आल्याने शिवसेनेला राजकीय “होळी”चा कायदेशीर चटका बसल्याचे तसेच नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेल्या व्यक्तीची पत्नी तिसरे अपत्य असताना विरावली ग्रामपंचायत उपसरपंच सौ. मनीषा विश्वनाथ पाटील बेकायदा कार्यरत कशा आहेत?याबाबत सुद्धा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि विरावली ग्रामपंचायतचे माजी सरपंच मुन्ना उर्फ तुषार सांडूसिंग पाटील यांच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक कार्यक्रम सुरू आहे निवडणूकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी त्यांच्या प्रभावामुळे तालुक्यात शिवसेनेच्या प्रभावाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरावली विविध कार्यकारी सोसायटीत एक नामनिर्देशनपत्र तिसरे अपत्य असल्याच्या कारणाने अवैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी.जे.तडवी यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्याचा निर्णय “होळी”च्या दिवशी देण्यात आल्याने शिवसेनेला राजकीय प्रतिष्ठेचा, “होळी”चा तसेच सहकार कायद्याचा मोठा चटका आणि झटका बसल्याने तालुक्यातील राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तिसरे अपत्य असणाऱ्या पतीचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने आता याच व्यक्तीची पत्नी( तिसरे अपत्य असताना)विरावली ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून कार्यरत कशा काय आहेत? विरावली ग्रामपंचायत उपसरपंच मनीष विश्वनाथ पाटील यांना तिसरे अपत्य असल्याची तक्रार यावल पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याकडे गेल्या वर्षापासून प्रलंबित असल्याने कारवाई का होत नाही? संबंधित अधिकाऱ्यांवर सत्‍ताधारी राजकारणाचा किंवा शिवसेनेचा प्रभाव,दबावतंत्र आहे का?असे तालुक्यातील राजकारणात बोलले जात आहे.

तिसरे अपत्य असल्याच्या आणि हरकत घेतलेल्या 8 जणांच्या तक्रार अर्ज प्रकरणात वकील म्हणून देवकांत पाटील यांनी भक्कम पुरावे सादर करून कामकाज पाहिले,तर इतर दुसऱ्या हरकत अर्जाबाबत वकील नथु पाटील यांनी कामकाज पाहिले.

विरावली विविध कार्यकारी सोसायटी ज्या सभासदांनी सोसायटी मधून कर्ज घेतले आहे अशा सभासदांनाच निवडणुकीत सहभागी होता येते अशा नियमामुळे यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व इतर अनेक कर्ज न घेणारे शेतकरी, सभासद निवडणुकीपासून वंचित राहिल्याने सुद्धा शिवसेनेच्या राजकीय खेळी बाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.त्यामुळे आता विरावली ग्रामपंचायत मधील गेल्या 10 ते 15 वर्षातील अनियमित कामांसह अपूर्ण पाणी पुरवठा योजनेचे मधील वस्तुस्थिती लवकरच जनतेसमोर येणार असल्याने याबाबत शिवसेनेचे पालक मंत्री गुलाबराव पाटील,शिवसेना आमदार सौ. लताताई सोनवणे,आमदार शिरीषदादा चौधरी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रीत करुन तालुक्यातील जनतेसह विरावली ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.

Spread the love