सरपंचपतीची ग्रामपंचायत सदस्याला जिवे ठार मारण्याची धमकी

0
12

यावल – तालुक्यातील पाडळसे येथे ग्रामपंचायत सदस्याला सरपंचपतीने जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडळसा ग्रामपंचायतच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच गुणवंती सुरज पाटील यांना मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य सुरेश बाविस्कर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या कामाबाबत विचारणा केली असता महिला सरपंच पती सूरज मनोहर पाटील हे ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर यांच्या घराजवळ   त्यांना शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुदेश बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारी वरून फैजपूर पोलीस ठाण्यात भादवि ५०४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.

Spread the love