खड्डा चुकवतांना रिक्षा उलटून दोघे ठार : तर तीन जन जखमी,

0
15

यावल – : ( प्रतिनिधि अमीर पटेल ) यावल येथे मुलांच्चा लग्नाच्चा बसत्यासाठी जाणारे नवरदेवाचे वडिल आणि काकू हे रिक्षा क्र. एम .एच १९बी.यु ५१५६ अपघातात ठार झाले आहे.

तर तीन जन जखमी झाले ही घटना भोरटेक जवळ ता यावल नजिक रविवारी दुपारी १२:३० वाजता घटना घडली आहे.

दिलीप दिनकर तायडे वय५० ज्योत्सना गोकुळ तायडे वय ४५ अशी मृत वडील आणि कांकूचे नाव आहे.

आंदलवाडी ता. रावेर येथील शुभम दिलीप तायडे यांच्या बस्ता रविवारी भुसावळ येथे होणार होता त्यासाठी कुटबिय व नातेवाइक रिक्षाने भुसावळकडे निघाले होते वाटेने (भोरटेक ) ता. यावल जवळ रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचा ताबा सुटला व अचानक रिक्षा उलटली भरदाव वेगात येत असतांना तीन वेळा उलटली प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले यात नवरदेवचे वडील आणि काळू ठार झाले .

तर ज्योती बुधाकर तायडे ‘ललिता संतोष तायडे , आणि बुधाकर भास्कर तायडे हे जखमी झाले आहेत . घटनेची माहिती मिळताच फैजपुर स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून जखमींना भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Spread the love