बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

0
11

संजय नन्नवरे                                                            यावलं – : बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेत ग्रामीण रुग्णालय यावल यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  आज दिनांक 7 रोजी करण्यात आली. किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, पौष्टिक आहार इत्यादी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. पालकांचे विद्यार्थी आरोग्य विषयक समाधान करण्यात आले. आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित तडवी, डॉक्टर परविन तडवी, औषध निर्माण अधिकारी श्री विनोद बोदडे, परिचारिका श्रीमती रूपाली बाविस्कर यांनी केले. काही विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय जळगाव येथे तपासणीचा सल्ला देण्यात आला. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील माळी सर यांच्या नियोजनानुसार शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी आरोग्य तपासणी यशस्वी करण्यास सहकार्य केले.

Spread the love