जळगाव धुळे महामार्गावरील टोल नाक्याची अज्ञाताकडून तोडफोड,

0
11

जळगाव  – जळगाव-धुळे महामार्गावरील टोल नाका अज्ञात बुरखाधारी तरुणांनी तोडफोड करून पेटवून दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा टोल नाका आजपासून सुरु होणार होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात बुरखाधारी तरुण काल मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव-धुळे महामार्गावर चार चाकी वाहनातून येत सब गव्हाण येथील टोलनाका तोडफोड करून पेटून दिल्यानंतर हे तरुण पसार झाले. या घटनेने खळबळ उडाली आहे. हा टोल नाका जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा होता.

पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावातील टोल नाका आजपासून सुरु होणार असल्याने आज उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन झाल्यावर हा टोल नाका वसुलीसाठी सुरु करण्यात येणार होता. दरम्यान आदल्या रात्रीच अज्ञात लोकांनी हल्ला करत टोल नाका पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी काही कर्मचारी टोल परिसरात झोपले होते. टोलवर आग लागल्याचं दिसताच त्यांनी पोलिसांना कळवले. या सर्व घटनेत टोल कंपनीचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

Spread the love