टावर चौकात अवैध पार्किंग व रिक्षावाल्यांच्या अतिक्रमणामुळे जवळपास एक तासभर वाहनांचा खोळबा…

0
44

प्रतिनिधी वीरेंद्र मंडोरा

जळगाव -आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी -तीन ते साडेचार वाजेपर्यंत जळगाव टावर चौकात अवैध कार  पार्किंग व बेजबाबदार रिक्षाचालक यांच्यामुळे पूर्ण एक ते दीड तास ट्रॅफिक जाम झाली व त्याच वेळी कोणताही ट्राफिक पोलीस कर्मचारी हजर नसल्याने वाहन चालकांना यावेळी मोठा त्रास सहन करावा लागला.त्यावर चौक म्हणजे महत्त्वाचा चौक असून एकही ट्राफिक पोलीस कर्मचारी हजार नसल्यामुळे  बऱ्याचशा वादावादीच्या घटना देखील घडल्या काही वेळानंतर पोलीस हेडकॉटर ला सूचना मिळाल्यानंतर ट्राफिक पोलीस हजर झाले. व ट्रॅफिक पूर्वत सुरू झाली शिवाजी महाराज नगर पुलचा वापर सुरुवात झाल्यामुळे येथे कायम तीन-चार ट्राफिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही असायला पाहिजे व टावर चौकात अवैध रिक्षा चालकांनी स्टॉप बनवून ठेवल्यामुळे नेहमी रधारीला अडचण निर्माण होत असल्याने टॉवर चौकातील रिक्षा थांबा त्वरित बंद करावा अशी मागणी येथील व्यापारी व नागरिकांन कडून केले जात आहे.

Spread the love